डोंबिवली, 14 जानेवारी, (हिं. स.) : प्रत्येक लहानथोरांना चालना मिळावी आणि चैतन्य निर्माण व्हावे, म्हणून येथील प्रसिद्ध काव्य रसिक मंडळाने विविध तीन गटांसाठी काव्य स्पर्धा आयोजित केली आहे.मराठी भाषेतील या स्पर्धेसाठी कोणताही विषय नाही. स्पर्धेकरिता अकरावी-बारावीतील विद्यार्थी, वय १८ ते ४५ वयोगट आणि त्यापुढील वयोगट असे तीन गट असतील.
कविता पाठवताना, काव्यरसिक मंडळ डोंबिवली, कविता स्पर्धा - गट क्रमांक १ साठी किंवा २ साठी किंवा ३ साठी असे वर ठळक लिहून खाली १६ ते २४ ओळींपर्यंतची कविता पाठवावी. स्वतःचे नाव, मोबाइल क्रमांक, कवितेचे शीर्षक, टाइप केलेली संपूर्ण कविता, शेवटी पुन्हा स्वतःचे नाव आणि मोबाइल क्रमांक या क्रमांकाने कविता पाठवावी. कविता स्वरचित असल्याची लेखी हमी प्रत्येक कवीने कवितेच्या खाली नमूद करावी. प्रत्येक कवीने एकच कविता आणि एकदाच पाठवावी. कविता पाठविण्यासाठी गटनिहाय मोबाइल क्रमांक असे - गट पहिला (अकरावी-बारावी) - उज्ज्वला लुकतुके (9819388415), गट दुसरा (वय वर्षे १८ ते ४५) - विजय जोशी
(9892752242), गट क्र. ३ (वय ४६ पासून पुढे) - दया घोंगे - (9869445492). आपली कविता ८ फेब्रुवारी २०२५ ते १० फेब्रुवारी २०२५ याच काळात पाठवावी. त्याआधी कविता पाठविल्यास ती बाद केली जाईल. स्पर्धेचे बक्षीस वितरण ९ मार्च रोजी होईल. त्याआधी यशस्वी स्पर्धकांना कळविले जाईल. उपस्थित असलेल्या यशस्वी स्पर्धकालाच बक्षीस दिले जाईल. पोस्टाने किंवा कुरियरने घरी पाठविले जाणार नाही. यशस्वी स्पर्धकाने वयाची ओळख दाखवण्यासाठी आधार कार्डाची सत्यप्रत, ओळखपत्र बरोबर आणावे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी