सोलापूर, 15 जानेवारी (हिं.स.)।
मंगळवेढ्यातून दुचाकीवरुन (एमएच १३, ईक्यु ०५६६) येत असताना मागून येणाऱ्या भरधाव कारने (एमएच ०९, जीएम ००६४) दुचाकीला जोरात धडक दिली. मंगळवेढा- सोलापूर रोडवरील शिंगोली (ता. मोहोळ) परिसरात हा अपघात झाला.अपघातात दुचाकीवरील तुषार अनिल पवार (वय २२, रा. राजेश कोठे नगर, सोलापूर) हा गंभीर जखमी झाला आणि अश्विन शिवाजी थोरात (वय २८, रा. धुम्मा वस्ती, सोलापूर) हाही जखमी झाला. गंभीर जखमी तुषार पवार याचा या अपघातात मृत्यू झाला. राजेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध कामती पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड