मुंबई , 15 जानेवारी (हिं.स.)।'ये जवानी है दीवानी','तमाशा' या सिनेमांमधून रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या जोडीने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि चाहत्यांची ही लाडकी जोडी बनली. 'तमाशा' चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एका पडद्यावर एकत्र झळकणार असल्याची चर्चा आहे. कार्तिक आर्यनच्या ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटामध्ये रणबीर-दीपिका आता एकत्र दिसणार आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यनने काही दिवसांपूर्वीच आगामी सिनेमाची घोषणा केली. 'तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी' असं सिनेमाचं टायटल आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनखाली सिनेमाची निर्मिती होत आहे. याच सिनेमात रणबीर-दीपिका कॅमिओ करणार आहेत. फक्त ते दोघंच नाही तर 'ये जवानी है दीवानी'मधील आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलीन सुद्धा दिसणार आहेत. नैना आणि बनीला पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटामधून 'ये जवानी है दीवानी'च्या आठवणीही ताज्या होणार आहेत.हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी आहे आणि ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाचे कलाकार यामध्ये आणखी भर देणार आहेत. अशा परिस्थितीत, निर्माते खास सादरीकरणासाठी या कलाकारांना आणण्याचा विचार करत आहेत. आता अश्यातच ‘ये जवानी है दिवानी’ या कलाकारांना या चित्रपटामध्ये पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.
'तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी' या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच, निर्मात्यांनी अद्याप मुख्य नायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची घोषणा केलेली नाही. तथापि, शर्वरी वाघ मुख्य भूमिका साकारू शकते अशा बातम्या समोर येत आहेत.त्यामुळे कार्तिक आर्यनच्या अपोझिट सिनेमात शर्वरी वाघ लीड रोलमध्ये दिसू शकते. 'मुंज्या' सिनेमाच्या यशानंतर शर्वरी वाघ सर्वांच्या नजरेत आली आहे. त्यामुळे करण जोहर सिनेमासाठी शर्वरीचा विचार करत आहे. मिड डे रिपोर्टनुसार, मेकर्स दोन वेगवेगळ्या युनिव्हर्सला या सिनेमातून एकत्र आणण्याची योजना आखत आहेत. ज्यामुळे दोन वेगवेगळ्या गोष्टींचं मिलन होऊ शकेल. यावरुन 'ये जवानी है दीवानी' चाही पुढचा पार्ट येणार का अशी चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode