पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)।
पुणे शहरातील प्रलंबित योजना व विकास कामांसाठी मोठी प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. हा निधी न मिळाल्याने शहराचा विकास खुंटत आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात केंद्र व राज्य सरकारने पुण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
माजी नगरसेवक दत्ता बहिरट, सुनील मलके, राजेंद्र सिरसाठ, रमेश अय्यर, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, चेतन आगरवाल, सुरेश कांबळे, आशुतोष जाधव, सचिन बहिरट आदी यावेळी उपस्थित होते.
अजित पवार यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन विकास कामात राजकारण न आणता शहराचे विकासाचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.पीएमपीच्या ताफ्यात २०० बसेस दाखल करण्याची सूचना पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक दीपाली मुंडे मुधोळ यांना दिली. शिवाजीनगर एस टी स्थानकाचे काम त्वरित सुरूच सुरू करण्याची मेट्रोचे व्यवस्थापक श्रावण हर्डीकर दिली, यासंदर्भात राज्य परिवहन मंडळाकडे पाठपुरवठा करण्यासही अजित पवार यांनी सांगितले आहे, असे जोशी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु