सोलापूर, 15 जानेवारी (हिं.स.)।
सामान्य लोकांसह पत्रकार, एससी, एससी, व्हीजेएनटी, कलाकार, दिव्यांग, सरकारी नोकरदार (केंद्र व राज्य शासनाचे), म्हाडाचे कर्मचारी, माजी सैनिक अशा विविध घटकांसाठी ‘म्हाडा’च्या माध्यमातून २० टक्के योजनेतून माफक दरात घरे मिळतात.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) दरवर्षी सामान्यांसाठी २० टक्के योजनेच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. ऑक्टोबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर या अर्जदारांची लॉटरी जानेवारीअखेर प्रसिद्ध होईल. त्यानंतर मार्च महिन्यात ‘म्हाडा’तर्फे २० टक्के योजनेची जाहिरात निघू शकते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड