सोलापूर, 15 जानेवारी (हिं.स.)।
कारखान्यावर ऊस सोडून गावाकडे परत निघालेल्या ट्रॅक्टर चालकास हात पाय बांधून मोबाईल हँडसेट, ट्रॅक्टर असा 8 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने पळवून नेल्याप्रकरणी बीड व जालना जिल्ह्यातील तिघांना तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांना बार्शी न्यायालयात उभे केले असता तिघांनाही न्यायमूर्ती जी. एस. पाटील यांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.जिग्नेेश अंजाबापू आडगळे (वय 19, रा. टाकरवन, ता. माजलगाव, जि. बीड) धिरज बाळू कारके (वय 24, रा. पाथरवाला, ता. अंबड, जिल्हा जालना) व विजय राजु साळवे (24, रा. शेलगाव थडी, ता. माजलगाव जि. बीड) अशी जबरी चोरी प्रकरणी अटक करून बार्शी न्यायालयात उभे केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या तिघांनी 13 जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बार्शी ते परंडा रस्त्यावर जिग्नेश आडगळे याच्या दुचाकीवर बसून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड