मुंबई, 4 जानेवारी (हिं.स.)।
'अप्पी आमची कलेक्टर' मध्ये नवीन वर्षात खूप घडामोडी घडणार आहे. अमोल आपल्या आई-वडिलांच्या लग्नाच्या आठवणींचा संग्रह एका स्क्रॅपबुकमध्ये जपून ठेवतो. ज्यामुळे अप्पी आणि अर्जुन भावूक होतात. अमोल आपल्या जीव वाचवल्याबद्दल गणपती बाप्पाला प्रार्थना करतो आणि आभार मानतो. अप्पीने रुग्णालयातील फसव्या नोकरीच्या प्रथांचा तपास करण्याचा निर्णय घेतल्याने तणाव निर्माण होतो. अमोलची तब्येत हळूहळू सुधारतेय आणि कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करतायत. अमोल पपेरमध्ये संकल्पचा फोटो पाहतो, ज्यामुळे एक नवीन गूढ निर्माण होत. अमोल आपल्या आजारात मदत करणाऱ्या सगळ्यांचे, कुटुंब आणि वैद्यकीय टीमचे, आभार मानण्याचा निर्णय घेतो. कुटुंब अप्पीच्या सत्कार सोहळ्याची तयारी करत असतानाच, संकल्पच्या भूमिकेबद्दल अमोलला सत्य सांगण्याची चिंता सतावते. सत्कार सोहळ्यात अप्पी तिच्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबाच्या समर्थनाबद्दल मनापासून आभार मानते. अनपेक्षितपणे, गायतोंडे अमोलला त्याच्या खंबीरपणाबद्दल दुसरा सन्मान जाहीर करतो. अमोल मंचावर जातो आणि आपल्या पालकांबद्दल, डॉक्टरांबद्दल, आणि कुटुंबाबद्दल मनोगत व्यक्त करतो. त्याचे भाषण सर्वांना भावते. अमोलला कलेक्टर ऑफिसमध्ये त्याच्या आजाराशी लढण्याच्या धैर्याबद्दल सन्मान केला जातो, तर अप्पीला घरच्या अडचणी असूनही तिची जबाबदारी चोख बजावल्याबद्दल कौतुक होत. सोहळ्यात अमोल त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानतो आणि माणिक (संकल्प) याचा उल्लेख करतो, ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो. बापू आणि विनायक अमोलला संकल्पबद्दल सत्य सांगण्याचा निर्णय घेतात. मात्र, अमोलच्या नाजूक प्रकृतीची काळजी घेऊन अप्पीआणि अर्जुन याला विरोध करतात. सत्कार सोहळ्याचे फोटो स्क्रॅपबुकमध्ये लावताना, अमोलला नवीन वर्षाचा संकल्प लिहायची कल्पना येते. तो कुटुंबातील सर्व सदस्यांचे संकल्प गोळा करतो आणि आपली वही वही देवासमोर ठेवतो आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमोल घरीच कार्यक्रम आखतो, आणि दीप्या आणि मोनाला अप्पी अर्जुनसोबत डांससाठी एकत्र आणतो. वर्ष संपताना, अमोल सगळ्यांच्या आनंदासाठी प्रार्थना करतो आणि कुटुंब आनंदाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत.
आता काय होईल जेव्हा अमोल समोर अर्जुन-अप्पीने लपवले सत्य येईल ? नवीन वर्षातली अमोलची प्रार्थना पूर्ण होईल ? बघायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर' ओमवर ते शनिवार संध्या ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर