विजय हजारे ट्रॉफी सामन्यात आयुष म्हात्रेचं सलग दुसरे शतक 
अहमदाबाद, 5 जानेवारी (हिं.स.)।मुंबईचा युवा ऑलराउंडर आयुष म्हात्रे याने नववर्षाची धडाक्यात सुरुवात केली आहे.आयुष म्हात्रे याने विजय हजारे ट्रॉफीतील राउंड 7 मधील सामन्यात विस्फोटक आणि झंझावाती शतकी खेळी केली.आयुषने सौराष्ट्रविरुद्ध एकूण 148 धावांची खेळ
आयुष म्हात्रे


अहमदाबाद, 5 जानेवारी (हिं.स.)।मुंबईचा युवा ऑलराउंडर आयुष म्हात्रे याने नववर्षाची धडाक्यात सुरुवात केली आहे.आयुष म्हात्रे याने विजय हजारे ट्रॉफीतील राउंड 7 मधील सामन्यात विस्फोटक आणि झंझावाती शतकी खेळी केली.आयुषने सौराष्ट्रविरुद्ध एकूण 148 धावांची खेळी केली. या खेळीसह आयुषने मुंबईचा विजय सोपा करुन दिला.आयुष म्हात्रेच्या या खेळीसाठी त्याचं क्रिकेट वर्तुळात अभिनंदन केलं जात आहे.

सौराष्ट्र विरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मुंबईला विजयासाठी 290 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मुंबईकडून आयुष म्हात्रे आणि जय बिष्टा ही सलामी जोडी मैदानात आली. या जोडीने स्फोटक सुरुवात केली. आयुष आणि जयने जोरदार फटकेबाजी केली. आयुषने या दरम्यान 38 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 षटकारासह अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांमध्ये 141 धावांची शतकी भागीदारी झाली. मात्र त्यानंतर 18 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर जय 45 धावांवर बाद झाला.जय आऊट झाल्यानंतरही आयुषने दुसऱ्या बाजूने फटकेबाजी सुरुच ठेवली. आयुषने 148 धावांसह या स्पर्धेतील त्याच्या तिसऱ्या सामन्यातील दुसरं शतक झळकावलं आहे.

आयुषने अर्धशतकानंतर अवघ्या 29 बॉलनंतर शतक पूर्ण केलं. आयुषने 67 बॉलमध्ये 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. आयुषने शतकानंतरही तडाखा सुरुच ठेवला. आयुषला आणखी मोठी खेळी करुन मुंबईला विजयी करुन नाबाद पोहचण्याची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. आयुष 148 धावांवर आऊट झाला.आयुषने 93 बॉलमध्ये 159.14 च्या स्ट्राईक रेटने 9 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 148 धावा केल्या. आयुषने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 22 चेंडूत 106 धावा केल्या. तर इतर रन्स धावून केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash


 rajesh pande