ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर टीम इंडियाचा परतीचा प्रवास झाला मुश्किल 
मुंबई , 6 जानेवारी (हिं.स.)।ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु असलेला पाचवा कसोटी सामना टीम इंडियाने गमावला आहे.ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेवर 3-1 विजय मिळवला आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर टीम इंडियाला आता आणखी एका संकटाला सामोरे जाव
टीम इंडिया


मुंबई , 6 जानेवारी (हिं.स.)।ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु असलेला पाचवा कसोटी सामना टीम इंडियाने गमावला आहे.ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेवर 3-1 विजय मिळवला आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर टीम इंडियाला आता आणखी एका संकटाला सामोरे जावे लागत आहे. भारतीय संघातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना मायदेशी परतण्यासाठी वेटिंगवर थांबावे लागणार आहे.त्यामुळे त्यांची घरवापसी मुश्किल झाली आहे.

भारतीय संघाच्या जवळपास दोन महिन्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता ही ७ जानेवारीला होणं अपेक्षित होते. सिडनीच्या मैदानातील तिसरा सामना ३ ते ७ जानेवारी २०२५ या पाच दिवसांच्या कालावधीत नियोजित होता. त्यामुळे टीम इंडिया ८ जानेवारीला ऑस्ट्रेलियातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार होती. पण सिडनी कसोटी दोन दिवस आधीच संपली.त्यामुळे आता टीम इंडियातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना मायदेशी परतण्यासाठी तिकिटांची जुळवाजुळ करावी लागत आहे. माहितीनुसार, काही वरिष्ठ खेळाडूंनी सोमवारीच फ्लाइट पकडल्याचेही बोलले जाते. पण अन्य खेळाडूंसाठी नियोजित वेळेआधी तिकीट मिळवण्यासाठी बीसीसीआयला धडपड करावी लागत आहे. तिकीट उपलब्ध होतील तसे संघातील खेळाडू मायदेशी परतणार आहेत.

भारतीय संघानं पर्थ कसोटी सामन्यातून दौऱ्याला सुरुवात केली होती.ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू दोन वेगवेगळ्या गटासह रवाना झाले होते. विराट कोहली संघासोबत न जाता फॅमिलीसोबत ऑस्ट्रेलियाला पोहचला होता. रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर संघाला जॉईन झाला होता. आता परतीच्या प्रवासातही खेळाडू एकत्र दिसणार नाहीत, हे स्पष्ट होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash


 rajesh pande