मुंबई , 7 जानेवारी (हिं.स.)।राकेश बापट आणि वल्लरी विराजची मुख्य भूमिका असलेली 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.या मालिकेतल्या अपडेट्सविषयी चाहत्यांच्या मनात कायम उत्सुकता असते. आता नवीन वर्षात या मालिकेत नवीन धमाके होणार आहेत ज्याची सुरुवात जहागीरदारांच्या न्यू इयर पार्टीमध्येच सुरु झाली आहे.या नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये एजे लीलाला हटके प्रपोज करताना दिसणार आहेत.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत लीला एजेसाठी चहा बनवत असताना दुर्गा येऊन एजेची चहा बनवायची पद्धत वेगळी असल्याचं लीलाला सांगते. लीला तीच न ऐकता स्वतःच्या पद्धतीनी चहा बनवून एजेला देते.एजे चहा पिताना लीला म्हणते, तुम्ही माझं हृदय जिंकलंय, आता माझ्यासाठी काहीतरी खास करा. हे सर्व पाहून दुर्गा येतो. एजे विश्वाला आयडिया विचारण्यासाठी कॉल करतो, पण सर्व आयडिया नाकारतो. त्याच्या खोलीत एजे एका पांढऱ्या गुलाबांच्या बुकेसह उभा आहे आणि लीला हे पाहून खुश होते. एजे दुर्गाला एक साधी घरगुती नववर्ष पार्टी आयोजित करण्याची सूचना देतो, ज्यामुळे दुर्गा आश्चर्यचकित होते.
विश्वरूप दुर्गाला सांगतो की एजेला कोणाला तरी आय लव्ह यू म्हणायचं आहे, जे ऐकून दुर्गा असं कधीच होणार नाही असे म्हणते. लक्ष्मी आणि सरस्वती लीलाला पार्टीबद्दल चुकीची माहिती देतात. एजे आणि सुनाही पार्टीसाठी तयार होतात, आणि सर्वजण लीलाला उशिर होणार हे गृहीत धरतात.एजे सर्वांना सांगतो की जरी लीला उशीरा आली तरी, ती परफेक्ट दिसेल. आणि अखेर पार्टीमध्ये लाइट्स गेल्यावर, लीला एकदम वेगळ्या आणि विचित्र पोशाखात स्पॉटलाइटमध्ये येते. सर्वजण तिच्या दिसण्यावर हसू लागतात. यावेळी नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये एजे लीलाला अश्या हटके स्टाईल मध्ये प्रपोज करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash