नाशिक, 8 जानेवारी (हिं.स.)।
जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा भव्यादिव्य चित्रपट संगीत मानापमान १० जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एक अद्वितीय अनुभूती देणारा संगीतमय चित्रपट असेल. काल पत्रकार परिषदेत सुबोध व वैदेही यांनी माहिती दिली.
अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी ही त्रयी त्यांच्या मराठमोळ्या विलोभनीय अंदाजात दिसेल.संगीत मानापमान या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत लाभलं आहे. केवळ संगीत नव्हे तर पारंपरिक नृत्य, तलवारबाजी आणि भव्य सेट, विलोभनीय दृष्य अशा बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. या चित्रपटात एकूण १४ गाणी आहेत. या गाण्यांना १६ दिग्गज गायकांनी आपला आवाज दिला आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव म्हणजे अद्वितीय गायकांनी सजवलेली मैफिल आहे. अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी सोबतच या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि आणखी प्रसिद्ध कलाकार दिसणार आहे त्यामुळे नक्कीच चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, निर्माती ज्योती देशपांडे, श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, संगीत मानापमान चित्रपट
१० जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात बघायला मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI