कॅलिफोर्निया, 7 जानेवारी (हिं.स.)।जगातील सर्वात प्रतिष्ठित सिनेमा पुरस्कारांपैकी एक असलेल्या ८२व्या गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड्स २०२५ सोहळा रविवारी संध्याकाळी संपन्न झाला. या पुरस्काराचे कॅलिफोर्निया येथील बेव्हरली हिल्टन येथे आयोजन करण्यात आले होते, जिथे विजेत्यांची घोषणा करण्यात आली.
जॅक ऑडियर्डचा फ्रेंच चित्रपट 'एमिलिया पेरेझ' या वेळी गोल्डन ग्लोबमध्ये ज्युरींच्या पसंतीस उतरला.'एमिलिया पेरेझ'ने सर्वाधिक नामांकनांसह आघाडी घेतली. टीव्हीच्या बाजूने, अमेरिका-जपान सह-निर्मिती शो 'शोगुन' हिट ठरला.या पुरस्कार शोमध्ये भारताची आशा दिग्दर्शक पायल कपाडिया यांच्याशी जोडली गेली होती, ज्यांच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाला दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट नॉन-इंग्लिश लँग्वेज मोशन पिक्चर' श्रेणीत नामांकन मिळाले होते, तर पायल कपाडियाला त्यासाठी 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' श्रेणीत नामांकन मिळाले होते. मात्र दोन्ही श्रेणींमध्ये एकही पुरस्कार मिळाला नाही. हा चित्रपट दोन्ही कॅटेगरीतून बाहेर पडला.त्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली.ब्रॅडी कॉर्बेटने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा किताब पटकावला.इतर नामांकनांमध्ये 'द बेअर', 'शोगुन', 'विक्ड' आणि 'चॅलेंजर्स' यांचा समावेश आहे.
८२व्या गोल्डन ग्लोबच्या प्रमुख श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकणाऱ्या विजेत्यांची नावे- बेस्ट पिक्चर- म्युझिकल/कॉमेडी- Emilia Perez, बेस्ट पिक्चर- ड्रामा- The Brutalist, बेस्टर मेल एक्टर मोशन पिक्चर- ड्रामा- Adrien Brody (The Brutalist साठी), बेस्ट फीमेल एक्टर मोशन पिक्चर- ड्रामा- Fernanda Torres (I'm Still Her साठी),बेस्ट ड्रामा सीरीज- Shogun, बेस्ट टीव्ही फीमेल एक्टर ड्रामा सीरीज- Anna Sawai (Shogun साठी), बेस्ट म्युझिकल/कॉमेडी सीरीज- Hacks, बेस्ट मेल एक्टर- लिमिटेड सीरीज, एंथोलॉजी सीरीज आणि टीव्ही मोशन पिक्चर- Baby Reindeer, सिनेमॅटिक अॅण्ड बॉक्स ऑफिस अचीव्हमेंट- Wicked, बेस्ट सॉन्ग- मोशन पिक्चर- El Mal' (Emilia Perez साठी), म्यूझिक कुणी दिलं- Clement Ducol, Camille, लिरिक्स- Clement Ducol, Camille, Jacques Audiard, बेस्ट स्कोर मोशन पिक्चर- Trent Reznor & Atticus Ross ('चैलेंजर्स' साठी), बेस्ट डायरेक्टर मोशन पिक्चर- Brady Corbet (The Brutalist साठी), बेस्ट एनिमेटेड मोशन पिक्चर- Flow, बेस्ट मेल एक्टर मोशन पिक्चर- म्युझिकल/कॉमेडी- Sebastian Stan ('द डिफरेंट मॅन' साठी), बेस्ट फीमेल एक्टर मोशन पिक्चर- म्युझिकल/कॉमेडी- Demi Moore (The Substance साठी), बेस्ट सपोर्टिंग मेल एक्टर- टीव्ही- Tadanobu Asano, बेस्ट सपोर्टिंग फीमेल एक्टर- टीव्ही- Jessica Gunning (Baby Reindeer साठी), बेस्ट टीव्ही फीमेल एक्टर लिमिटेड सीरीज, एंथोलॉजी सीरीज आणि टीव्ही मोशन पिक्चर- Jodie Foster (ट्रू डिटेक्टिव: नाइट कंट्री साठी), बेस्ट टीवी मेल एक्टर लिमिटेड सीरीज, एंथोलॉजी सीरीज आणि टीव्ही मोशन पिक्चर- Colin Farrell (द पेंग्वुइन साठी), बेस्ट पिक्चर- नॉन इंग्लिश- Emilia Perez (फ्रान्स), बेस्ट टीवी मेल एक्टर- ड्रामा सारीज- Shogun साठी Hiroyuki Sanada, बेस्ट सपोर्टिंग मेल एक्टर- मोशन पिक्चर- Kieran Culkin, बेस्ट स्टॅंड-अप कॉमेडियन ऑन टीव्ही- Ali Wong, बेस्ट स्क्रीनप्ले- मोशन पिक्चर- Peter Straughan (कॉन्क्लेव), बेस्ट टीवी मेल एक्टर म्युझिकल/कॉमेडी सीरीज- Jeremy Allen White, बेस्ट टीव्ही फीमेल एक्टर- म्युझिकल/कॉमेडी सीरीज- Jean Smart, बेस्ट सपोर्टिंग एक्टर- टीव्ही Tadanobu Asano (Shogun), बेस्ट सपोर्टिंग फीमेल एक्टर- मोशन पिक्चर- Zoe Saldana, बेस्ट टीव्ही मेल एक्टर- ड्रामा सीरीज- Hiroyuki Sanada (Shogun साठी), बेस्ट सपोर्टिंग मेल एक्टर- मोशन पिक्चर- Kieran Culkin (ए रियल पेन साठी)
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash