मुंबई, 7 जानेवारी (हिं.स.)।
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत एक मोठा धमाका होणार आहे. मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध आणि जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मालिकेत धमाकेदार एन्ट्री होणार आह . त्या एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत आणि त्यांच्या भूमिकेचं नाव आहे 'गुरुमा'. गुरुमाच्या एन्ट्रीने जयश्रीची ही तारांबळ उडणार आहे. गुरुमा, एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवची म्हणजेच आकाशच्या बाबांची बहीण आहे. कुटुंबात त्या मोठ्या सुनेची पारख करणार आहे. जयश्री, गुरुमाची सर्व जबाबदारी वसुंधरावर सोपवते, तिला आशा आहे की वसुंधरा अपयशी ठरेल. वसुंधरा गुरुमा यांना प्रभावित करते आणि त्यांचा आदर मिळवते. गुरुमाच्या शिष्यांच आगमन होते तेव्हा वसुंधरा त्यांची काळजीही घेत. जयश्री आणि तनयाची कारस्थानं सुरूच आहेत. पण वसुंधराची प्रामाणिकता ह्यात उजवी ठरते. तनया, वसुंधरानी गुरुमासाठी तयार केलेलं जेवण दूषित करण्याचा प्रयत्न करते. पण वसुंधराच्या खरी माफी आणि चिकाटीमुळे गुरुमा तिच्यावर विश्वास ठेवतात. गुरुमा वसुंधराला एक तपस्वी कार्य नियुक्त करतात. तर दुसरीकडे अखिल, एक महत्त्वाची बिझनेसची मिटिंग करत असताना, वसुंधरा आकाशला सांगते की त्या दिवशीच्या सर्व मिटिंग रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्याऐवजी मुलांसोबत एक पिकनिक आयोजित करण्याचा विचार करते. यामुळे तणाव निर्माण होतो तेव्हा आकाश आणि वसुंधरा यामध्ये वाद होतो. वसुंधरा अखेरीस त्या दिवशीची सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळून ऑनलाइन मीटिंग आयोजित करते आणि क्लायंटच्या समस्यांचे निराकरण करते. ऑनलाइन मीटिंगदरम्यान, वसुंधरा चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळते.
वसुंधराच्या आयुष्यात आलेल्या परीक्षेला कशी सामोरी जाईल आणि गुरुमाच मन कसंजिंकेल हे बघायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' सोमवार ते शनिवार संध्या. ६वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर