कॅनडा अमेरिकेचाच भाग! ट्रम्‍प यांनी शेअर केला नकाशा, कॅनडामधील नेते संतप्त 
वॉशिंग्टन, 8 जानेवारी (हिं.स.)। डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वीच ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. कॅनडा हा काही देश नाही ते तर अमेरिकेचे ५१वे राज्य आहे, असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
नकाशा


वॉशिंग्टन, 8 जानेवारी (हिं.स.)। डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वीच ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. कॅनडा हा काही देश नाही ते तर अमेरिकेचे ५१वे राज्य आहे, असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवस सातत्‍याने करत आहेत.आता त्‍यांनी थेट कॅनडाला अमेरिकेचाच एक भाग दर्शविणारा नकाशा साेशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावर कॅनडाच्या नेत्यांनी आणि जनतेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दोन नकाशे शेअर केले आहेत ज्यात त्यांनी कॅनडाला अमेरिकेचा भाग म्हणून दाखवले आहे. या नकाशांद्वारे त्यांनी आपला हेतू पूर्णपणे स्पष्ट करत कॅनडाला अमेरिकेत समाविष्ट करायचे असल्याचे सांगितले आहे. ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, “कॅनडा अमेरिकेचा भाग झाला तर तेथे कोणताही कर लागणार नाही.” कर खूप कमी होतील आणि ते रशियन आणि चिनी जहाजांच्या सतत वेढा घालण्याच्या धोक्यापासून पूर्णपणे सुरक्षित होतील. एकत्रितपणे, हा देश किती महान होईल. कॅनडाने ट्रम्प यांच्या प्रस्तावाकडे लक्ष दिलेले नाही. कॅनडाने अमेरिकेच्या दक्षिणेकडील सीमेवरून अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर स्थलांतर थांबवले नाही तर कॅनडाच्या आयातीवर 25 टक्के कर लागू केला जाईल, असा ट्रम्प यांनी इशाराही दिला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या कृतीमुळे कॅनडाचे नेते चांगलेच संतप्त झाले आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ट्रम्प यांचा प्रस्ताव साफ फेटाळला आहे. ट्रूडो यांनी स्पष्टपणे सांगितले की कॅनडा अमेरिकेचा भाग होण्याची शक्यता नाही. कॅनडा हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे आणि तो असा कोणताही प्रस्ताव स्वीकारणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.तर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनीही ट्रम्प यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी एक पोस्ट करून ट्रम्प यांच्या टिप्पण्यांवरून असे दिसून येते की त्यांना कॅनडाची ताकद आणि स्वातंत्र्य पूर्णपणे समजलेले नाही. कॅनडा कधीही धमक्यांकडे झुकणार नाही, असेदेखील जोली यांनी यावेळी म्हटले. ट्रम्प यांच्या प्रस्तावाचा कॅनडाचे विरोधी पक्षनेते पियरे पॉलीवेअर यांनीही निषेध केला आहे. ते म्हणाले, “कॅनडा एक महान आणि स्वतंत्र देश आहे आणि अमेरिकेचा सर्वात चांगला मित्र आहे, परंतु हे त्याच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात आहे. ट्रम्प यांनी निर्माण केलेल्या वादाचा परिणाम कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर तर होऊ शकतोच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेच्या प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो. कॅनडा आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande