अमरावतीत २८ ग्रामसेवक आदर्श पुरस्काराने सन्मानित
अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.) जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून दरवर्षी ग्रामविकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातो. यावर्षी जिल्ह्यातील २८ ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बुधवारी जिल्हा परिषदेच्या पं
२८ ग्रामसेवक आदर्श पुरस्काराने सन्मानित मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण


अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.)

जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून दरवर्षी ग्रामविकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातो. यावर्षी जिल्ह्यातील २८ ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बुधवारी जिल्हा परिषदेच्या पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यपालन अधिकारी संजिता महापात्र यांच्या हस्ते ग्रामसेवकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जिल्ह्यात प्रत्येक गाव खेड्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची निवड केली जाते, ग्रामपंचायतचा कारभार अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडणाऱ्या व ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढविणाऱ्या ग्रामसेवकांची या पुरस्कारामध्ये निवड केली जाते. जिल्ह्यातील १४ तालुक्यातून २८ ग्रामसेवकांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जिल्हा परिषदेच्या सीईओ संचिता महाप- ात्रा यांच्या हस्ते ग्रामसेवकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये सुजाता इंगळे, सचिन कोरडे (दर्यापूर), मदन अकोलकर, सुरेश रेखाते (चांदूरबाजार), रजीलाल रबळे, कांचन चव्हाण (नांदगाव खंडेश्वर), सचिन तसरे, राजू आहेरराव (धामणगाव रेल्वे), रामप्रसाद काणेकर, रामलाल भिलावेकर (धारणी), गोपाल चिरडे, पुष्पलता देशमुख (तिवसा), मंगला साळुंखे, प्रमोद धोत्रे (अंजनगाव सुर्जी), मनीषाशिरसाठ, मीना (चिखलदरा), एस.एम. सोळंके झोलेकर, अनुराधा विधळे (मोर्शी), संजय शिवरकर, संजय शिरसाट (चांदूर रेल्वे), विनोद राऊत, अतुल यावले (वरुड), निलेश इंगळे, ताज परवीन शेरखा पठाण (अचलपूर), वनिता चव्हाण, बाळकृष्ण कदम (भातकुली), संजीव राठोड (अमरावती) यांचा समावेश आहे.हा पुरस्कार सन २०२२-२३ या वर्षाकरीता देण्यात आला असून या कार्यक्रमाला पंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय देऊतकर, ममता वजीर, सुनील वानखडे, परीक्षित बाराहाते, दिनेश तायडे, प्रफुल्ल कांडलकर, अमोल गाडेकर, पंकज भोसले, विवेक कानेकर, श्रीकृष्ण राणे, माहुलकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande