वलगाव नया अकोला चांदुरबाजार महामार्गावर जीवघेणे खड्डे 
अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.) वलगाव नया अकोला चांदुरबाजार राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळत आहे अनेक दुचाकी चालक व चारचाकी चालक या महामार्गाने प्रवास करत असतात मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळ
वलगाव नया अकोला चांदुरबाजार महामार्गावर जीवघेणेख खड्डे


अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.)

वलगाव नया अकोला चांदुरबाजार राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळत आहे अनेक दुचाकी चालक व चारचाकी चालक या महामार्गाने प्रवास करत असतात मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे अनेक दुचाकी चालकांना व चारचाकी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच नया अकोला जावरा कामनापुर जळतापुर दर्याबाद जळका हिरापुर या गावातील विद्यार्थी दररोज सकाळी याच महामार्गाने ऑटोने प्रवास करून शाळेत जात असतात मात्र रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे .

याच महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची महिलांची तसेच शाळकरी मुला मुलींची मोठी डोकेदुखी वाढली आहे रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था या महामार्गाची झाली आहे कुठल्याही प्रकारची डागडुजी या महामार्गाची करण्यात येत नाही असा गंभीर आरोप देखील या महामार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केला आहे अनेक दुचाकी चालक विविध गावातुन याच महामार्गाने वलगाव अमरावती कामानिमित्त प्रवास करत असतात मात्र यातील दोन दुचाकी चालक याच महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे किरकोळ जखमी सुद्धा झाले होते याच खड्ड्यांमुळे बहुतांश दुचाकी चालकांचे व चारचाकी चालकांच्या गाडीचे स्पेअर पार्ट देखील तुटले आहेत अतिशय महत्त्वाचा व वर्दळीचा समजलाय जाणारा हा महामार्ग खड्डेमय झाला आहे स्वताचा जिव धोक्यात टाकून या महामार्गाने प्रवाशांना प्रवास करावा लागतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande