अमरावती ते पुणे आणि मुंबई वंदे भारत ट्रेनबाबत भुसावळ रेल्वे अधिकाऱ्यांना सूचनाच नाही
अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.) पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून नवीन वर्षाची चांगली भेट मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने अमरावती ते पुणे आणि अमरावती ते मुंबई वंदे भारत ट्रेन चालविण्याची तयारी केली आहे. गाड्यांचे या वेळापत्रक आल्याचाही दावा
अमरावती ते पुणे आणि मुंबई वंदे भारत ट्रेनबाबत भुसावळ रेल्वे अधिकाऱ्यांना सूचनाच नाही


अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.)

पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून नवीन वर्षाची चांगली भेट मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने अमरावती ते पुणे आणि अमरावती ते मुंबई वंदे भारत ट्रेन चालविण्याची तयारी केली आहे.

गाड्यांचे या वेळापत्रक आल्याचाही दावा करण्यात येत आहे. या संदर्भात भुसावळ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशासारखे अनेक प्रस्ताव आहेत. मात्र या संदर्भात अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात अमरावती येथील अधिकाऱ्यांनीसुध्दा अशाच प्रकारचे उत्तर दिले. त्यांचे म्हणणे आहे की प्रस्ताव आहे, मात्र त्यासंदर्भात सूचना मिळाली नाही. विशेषतः अमरावती - पुणे वंदे भारत एक्सप्रेस शिवाय पुणे- शेगाव वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याचे वृत्त होते. नुकत्याच्या ल्वे प्रशासनातील नविन घडामोडीनुसार मध्य रेल्वे आठवड्यात अनेक दिवसअमरावती ते मुंबई वंदे भारत ट्रेन चालविण्याचे नियोजन केले आहे. त्याचे वेळापत्रकसुध्दा जारी करण्यात आले आहे. अमरावती-पुणे वंदे भारत ट्रेन ४.२० वाजता मॉडेल स्टेशनवरून सोडण्यात येणार आहे. या गाडीला पाच थांबे राहणार आहेत. त्यामध्ये अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाडचा समावेश आहे. गाडी त्याच दिवशी ३.४० वाजता पुणे येथून अमरावती करिता निघणार आहे. ती रात्री २३. ४५ वाजता अमरावतीला पोहचणार आहे. तसेच अमरावतीवरून वंदे भारत रेल्वे मुंबईकरिता ३.४० वाजता सुटणार आहे. ही गाडीअमरावती - पुणे व अमरावती-मुंबई धावणार वंदे भारत ट्रेन सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी मुंबईला पोहोचणार आहे. मुंबई येथून अमरावती करिता ३ वाजून ५५ मिनिटांनी गाडी सुटणार आहे. ती अमरावतीला रात्री ११.२५ वाजता पोहचार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या गाडीला अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड नाशिक येथे थांबे देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. वंदे भारत रेल्वे सर्व पश्चिम विदर्भातील व्यापारी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुविधाजनक ठरणार आहे.

गाडीत अनेक सुविधा उपलब्ध : वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभ पाच

वर्षापूर्वी २०१९ मध्ये झाला. या १८ डब्याच्या गाडीला ट्रेन १८ पण म्हटल्या जाते. इलेक्ट्रीक मल्टी युनिट ट्रेन १३० किमी प्रति तासाच्या वेगाने धाव आहेत. यामध्ये सोळा डब्बे वातानुकूलीत आणि दोन डब्बे एज्युकेटिव्ह क्लासचे आहेत. प्रत्येक ट्रेनची क्षमता ११२८ प्रवाशांची आहे. बोगीमध्ये अधिक साहित्य ठेवण्याची व्यवस्था असून स्वयंचलित दरवाजे आहेत. ज्याचे नियंत्रण लोकोपायलट कडे आहे. ३२ इंची एलसीडी टीव्हीपण प्रत्येक बोगीत नाहे. तसेच ऑन बोर्ड हॉटस्पॉट, वायफाय, व अत्यंत आरामदायक आसान व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरची उष्णता आणि आवाज नियंत्रित रण्याकरिता इंशुलेशन पण कार्यान्वित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande