छत्रपती संभाजीनगर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्या चा १० वा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ संपन्न झाला.
चोंढाळा ता. पैठण येथे रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड चोंढाळा विहामांडवा येथे २०२५-२६ गळीत हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपण समारंभ आज कारखान्याचे संचालक राजु नाना भुमरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ छायाताई राजु नाना भुमरे यांच्या शुभहस्ते आणि खासदार संदिपान पाटील भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होम हवन पूजा करून संपन्न झाला.
यावर्षी कारखान्याचे गाळप क्षमतेमध्ये वाढ केलेली असून आपला कारखाना यावर्षी २१०० ते २२०० मे. टन प्रतिदिन या प्रमाणे गाळप करण्यासाठी कारखान्यामध्ये हर्वेस्टर वाहने खाली करण्यासाठी नवीन टिपलर क्षमता वाढीसाठी एस के बॉडी, पॅन, क्रिस्टलायझर, हीटर, सल्फर भट्टी, ऑलिव्हर इत्यादी प्रकारची नवीन मशिनरी बसवलेली आहे. २१०० ते २२०० प्रतिदिन गाळप करण्यासाठी अनेक प्रकाराचे छोटे मोठे बदल केलेले आहेत. त्यासाठी सुमारे ६ ते ७ कोटी रु. खर्च केलेला आहे.
तसेच यावर्षी कारखाना सुमारे ३ ते ३.५० लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी लागणारी पुरेशी व सक्षम अशी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा आपण भरणा केलेली आहे. त्यासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेला ६ ते ७ कोटी रु. अँडव्हान्स चे वाटप केलेले आहे.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन नंदू काका पठाडे, नंदू अण्णा काळे, डॉ. संदीपान काकडे, पोलीस निरीक्षक सचिन पंडित, सह विहामांडवा पोलीस चौकीचे पीएसआय हरिविजय बोबडे व अंमलदार बरबडे यांच्यासह सभासद, कर्मचारी, शेतकरी तसेच मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis