अंबरनाथमध्ये रस्ता अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
ठाणे, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। अंबरनाथमधील आयटीआय समोरील स्पीड ब्रेकरला दुचाकी धडकल्याने काल रात्री दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अंबरनाथ पोलिस ठाण्याचे पथक या घटनेचा तपास करत आहे. शनिवारी रात्री उशिरा अंबरनाथमधील आयटीआयसमोरील स्पीड ब्रेकरला दुचाकी
accident


ठाणे, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। अंबरनाथमधील आयटीआय समोरील स्पीड ब्रेकरला दुचाकी धडकल्याने काल रात्री दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अंबरनाथ पोलिस ठाण्याचे पथक या घटनेचा तपास करत आहे.

शनिवारी रात्री उशिरा अंबरनाथमधील आयटीआयसमोरील स्पीड ब्रेकरला दुचाकी धडकल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.

दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पवन हमकरे (२३) आणि प्रणव बोरक्ले (१७) अशी मृत तरुणांची ओळख पटली आहे. दोघेही अंबरनाथमधील मुरलीधर नगर येथील रहिवासी आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande