परभणी - विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविले सुंदर आकाश कंदील
परभणी, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशाकंदील तयार केले.दीपावली सणानिमित्त कार्यानुभव विषयाअंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांच्या कला गुणा
विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविले सुंदर  आकाश कंदील


परभणी, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशाकंदील तयार केले.दीपावली सणानिमित्त कार्यानुभव विषयाअंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी,नवनिर्मिती क्षमता विकसित होण्यासाठी स्वनिर्मित आकाशकंदील तयार करण्याचा उपक्रम सौ.रागिणी जकाते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या या कलाकृतीचे स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी,कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर,शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे,शंकर राऊत,अनिल कौसडीकर आदींनी कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande