एलोन मस्कच्या स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटची ११ वी चाचणी यशस्वी
वॉशिंग्टन , 14 ऑक्टोबर (हिं.स.)।जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलोन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने पुन्हा एकदा मोठं यश मिळवलं आहे. स्टारशिप या जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटची ११वी चाचणी यशस्वी ठरली आहे. मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजता टेक्सास
एलोन मस्कच्या स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटची ११ वी चाचणी यशस्वी


वॉशिंग्टन , 14 ऑक्टोबर (हिं.स.)।जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलोन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने पुन्हा एकदा मोठं यश मिळवलं आहे. स्टारशिप या जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटची ११वी चाचणी यशस्वी ठरली आहे. मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजता टेक्सासमधील बोका चिका येथून या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. उड्डाणानंतर स्टारशिपनं अंतरिक्षात यशस्वी प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर हिंद महासागरात सुरक्षित लँडिंग करण्यात आली.

स्टारशिप या रॉकेटनं टेक्सासच्या दक्षिण टोकावरून मोठ्या गजरात आकाशात झेप घेतली. उड्डाणानंतर त्याचा बूस्टर रॉकेट वेगळा झाला आणि नियोजनानुसार मेक्सिकोच्या उपसागरात नियंत्रित लँडिंग केली. यानंतर मुख्य अंतराळयान (स्टारशिप) अंतरिक्षात फिरत राहिलं आणि शेवटी हिंद महासागरात यशस्वीपणे उतरलं. ही चाचणी सुमारे १ तास ६ मिनिटांची होती. यामध्ये सर्व उद्दिष्टं पूर्ण करण्यात आली. स्पेसएक्स कंपनीनं सांगितलं की या मिशनमधून मिळालेला डेटा पुढील मॉडेल अधिक सक्षम बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

ही फुल-स्केल स्टारशिपची ११वी चाचणी उड्डाण होती, आणि याचाच वापर स्पेसएक्सचे संस्थापक व सीईओ एलोन मस्क मानवांना मंगळ ग्रहावर पोहोचवण्यासाठी करणार आहेत. नासालाही या रॉकेटची लवकरच गरज आहे, कारण स्पेसएक्स 403 फूट (123 मीटर) उंच स्टारशिपशिवाय दशकाच्या शेवटी अंतराळवीरांना चंद्रावर उतरवू शकणार नाही.

हे रॉकेट जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्सने बनवले आहे. स्टारशिप अंतराळयान (वरचा भाग) आणि सुपर हेवी बूस्टर (खालचा भाग) यांना एकत्रितपणे स्टारशिप म्हणतात. हे वाहन ४०३ फूट उंच आहे आणि पूर्णपणे पुन्हा वापरता येण्याजोगे आहे.

यावर्षीच्या सुरुवातीला स्टारशिपचे अनेक चाचणी उड्डाणे अयशस्वी ठरली होती, मात्र या यशानं टीमचा आत्मविश्वास प्रचंड वाढवला आहे. आता कंपनी स्टारशिप वर्जन-3 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जो आधीच्या तुलनेत अधिक शक्तिशाली असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande