नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर (हिं.स.) : भारताच्या आसाममध्ये आज, शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. त्याचवेळी शेजारच्या पाकिस्तानमध्येही भूकंप झाला. रिअॅक्टर स्केलवर असममध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता 2.7 आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 3.5 होती. सुदैवाने, दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीएस) माहितीनुसार, शनिवारी पहाटे 3:29:57 वाजता असममध्ये भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्र 24.84 अंश उत्तरे अक्षांश आणि 93.20 अंश पूर्व देशांतरावर, म्हणजेच कछार जिल्ह्यात 10 किलोमीटर खोल जमिनीखाली होते. यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही. त्याचप्रमाणे, पाकिस्तानमध्येही सकाळी 5 वाजून 4 मिनिटांनी 3.5 तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचे केंद्रही 10 किलोमीटर खोल होते. याआधी शुक्रवारीदेखील पाकिस्तानमध्ये 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता.
पाकिस्तान हा जगातील भूकंप-संवेदनशील देशांपैकी एक आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये अनेक प्रमुख भूकंपीय क्षेत्र आहेत. बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि गिलगित-बाल्टिस्तान हे प्रांत यूरेशियन प्लेटच्या दक्षिणी सीमेवर स्थित आहेत, तर सिंध आणि पंजाब हे भारतीय प्लेटच्या उत्तर-पश्चिम सीमेवर आहेत, त्यामुळे येथे वारंवार भूकंप होण्याची शक्यता अधिक असते.
बलुचिस्तान हा भाग अरब आणि यूरेशियन प्लेट्सच्या सक्रिय सीमेजवळ असल्यामुळे अधिक संवेदनशील मानला जातो. पंजाबसारखे इतर भाग, जे भारतीय प्लेटच्या उत्तर-पश्चिम सीमेवर आहेत, हे देखील भूकंपीय हालचालींसाठी अत्यंत संवेदनशील आहेत.-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी