पंतप्रधानांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
नवी दिल्ली , 2 ऑक्टोबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२) राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळ राजघाट येथे पोहोचले आणि त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ते माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या सम
पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली , 2 ऑक्टोबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२) राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळ राजघाट येथे पोहोचले आणि त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ते माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळ विजयघाट येथेही गेले आणि त्यांच्या जन्मदिनी त्यांना नमन करून श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरील ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले, “गांधी जयंती ही प्रिय बापूंना त्यांच्या असाधारण जीवनासाठी श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. त्यांच्या आदर्शांनी मानवतेच्या इतिहासाची दिशा बदलून टाकली. त्यांनी दाखवून दिलं की, धैर्य आणि साधेपणा हे मोठ्या बदलांचे प्रभावी साधन ठरू शकतात.” मोदी म्हणाले की, गांधीजी सेवेला आणि करुणेला लोकांना सक्षम बनवण्याचं अत्यावश्यक साधन मानत होते.

पंतप्रधानांनी देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही श्रद्धांजली अर्पण केली, ज्यांची जयंतीही गुरुवारी (2 ऑक्टोबर) आहे. त्यांनी शास्त्रींना एक असामान्य राजकारणी म्हणून संबोधलं, ज्यांच्या प्रामाणिकपणा, नम्रता आणि दृढ निश्चयाने भारत अधिक बळकट झाला. पंतप्रधान म्हणाले, “लाल बहादूर शास्त्री हे प्रेरणादायी नेतृत्व, सामर्थ्य आणि निर्णायक कृतीचे प्रतीक होते. ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या घोषणेनं आपल्या जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागवली. ते आजही आपल्याला एक मजबूत आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने प्रेरणा देतात.”

पंतप्रधान मोदी स्वदेशीवर नेहमीच विशेष भर देत आले आहेत. त्यांनी म्हटले की, भारतीयांनी भारतीय उत्पादनांची खरेदी करणे हेच गांधीजी आणि शास्त्रीजी यांना खरी श्रद्धांजली असेल. ते म्हणाले की, स्वदेशी ही आत्मनिर्भर आणि विकसित भारताची खरी पायाभरणी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande