राहुल गांधी कलंक, सर्वत्र जाऊन भारताची बदनामी करतात - कंगना रणौत
नवी दिल्ली , 2 ऑक्टोबर (हिं.स.)।राहुल गांधी सर्वत्र जाऊन भारताची बदनामी करत आहेत, असा आरोप भाजप खासदार कंगना रणौत यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. पुढे कंगना यांनी राहुल गांधींना “एक कलंक ”असे संबोधले आहे.कंगनाच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळ
कंगना रणौत


नवी दिल्ली , 2 ऑक्टोबर (हिं.स.)।राहुल गांधी सर्वत्र जाऊन भारताची बदनामी करत आहेत, असा आरोप भाजप खासदार कंगना रणौत यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. पुढे कंगना यांनी राहुल गांधींना “एक कलंक ”असे संबोधले आहे.कंगनाच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आलं आहे.

कंगना रणौत यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना राहुल गांधींवर तीव्र टीका करत म्हणाल्या , “ते एक कलंक आहेत. सर्वांना माहीत आहे की ते सर्व ठिकाणी जाऊन देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, देशाची टीका करत आहेत. ते म्हणतात की इथले लोक भांडकुदळ आहेत, प्रामाणिक नाहीत. अशा वक्तव्यांमधून ते हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की भारताचे लोक मूर्ख आहेत. जर त्यांना हेच म्हणायचं असेल, तर म्हणूनच मी त्यांना देशावरचा ‘कलंक’ म्हणते. ते नेहमी देशाला लाजिरवाणं करतात. देशालाही त्यांच्यावर लाज वाटते.”

कंगना रणौत यांनी पुढे खादी या विषयावर बोलताना म्हंटल्या कि,“तुम्ही पाहू शकता की मी खादीची साडी आणि खादीचा ब्लाऊज परिधान केला आहे. आपल्या स्वदेशी कपड्यांना आणि कापडांना आज जगभरात मोठी मागणी आहे. पंतप्रधान म्हणतात तसं, दुर्दैवाने आपल्याला अनेक गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं, म्हणून आता पूर्ण आत्मनिर्भर होण्याची वेळ आली आहे.”

“या प्रयत्नांत आपण खादीचे कपडे मोठ्या प्रमाणात विकत घेतो, पण पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’ मध्ये एक आवाहन केलं होतं. त्यांनी विशेषतः म्हटलं होतं की 2 ऑक्टोबर रोजी खादी खरेदी करायला यावं.त्यामुळे, त्यांच्या शब्दांचा सन्मान करत, आम्ही आज इथे आलो आहोत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande