ज्येष्ठ गायक पद्मविभूषण पं. छन्नूलाल मिश्र यांचे निधन
वाराणसी, २ ऑक्टोबर (हिं.स.) : शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्र यांचे आज, गुरुवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. पहाटे 4.15 वाजता मिर्झापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून आजारी होते. काही दिवसां
शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र


वाराणसी, २ ऑक्टोबर (हिं.स.) : शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्र यांचे आज, गुरुवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. पहाटे 4.15 वाजता मिर्झापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) सर सुंदरलाल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डिस्चार्ज दिला होता. दरम्यान पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मुलगी नम्रता यांनी दिली.

छन्नूलाल मिश्र यांचे पार्थिव सकाळी 11 वाजेपर्यंत मिर्झापूरहून वाराणसीत आणण्यात आले. दिवसभर लोकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळनंतर वाराणसी येथे त्यांची अंत्ययात्रा निघेल.

पंडित मिश्र यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विशेष संबंध होते. 2014 मध्ये मोदींनी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा छन्नूलाल मिश्र हे त्यांचे प्रस्तावक होते. त्यांच्या योगदानासाठी 2010 मध्ये पद्मभूषण, तर 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारनेही त्यांना यश भारती पुरस्कार दिला होता. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महान युग संपुष्टात आले असून, संगीत रसिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande