सिंगापूर पोलिसांनी झुबीन गर्गचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट भारतीय उच्चायुक्तालयाकडे सोपवला
गुवाहाटी, २ ऑक्टोबर (हिं.स.) गेल्या महिन्यात सिंगापूरमध्ये निधन झालेल्या लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्गच्या मृत्यूबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. सिंगापूर पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि प्राथमिक तपासातील निष्कर्षांची प्रत भारतीय उच्चायुक्तालयाकड
जुबीन गर्ग खून प्रकरणात व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि कार्यक्रमाचे आयोजक श्यामकनू महंतला अटक


गुवाहाटी, २ ऑक्टोबर (हिं.स.) गेल्या महिन्यात सिंगापूरमध्ये निधन झालेल्या लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्गच्या मृत्यूबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. सिंगापूर पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि प्राथमिक तपासातील निष्कर्षांची प्रत भारतीय उच्चायुक्तालयाकडे सोपवली आहे.

गर्गचा मृत्यू स्कूबा डायव्हिंग करताना झाल्याचे म्हटले होते. पण अहवालात स्पष्ट केले होते की, ते सेंट जॉन्स बेटाजवळ पोहताना बुडाला. सिंगापूर पोलीस दलाने आधीच स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात कोणताही कट किंवा संशयास्पद घटक नाही. कायदेशीर तज्ञांचा असा विश्वास आहे की, या प्रकरणाची चौकशी केली जाऊ शकते. ज्यामुळे घटनेभोवतीच्या घटना आणि परिस्थितीचा संपूर्ण क्रम स्थापित होईल. ज्यामध्ये मृत्यू कधी, कसा आणि कुठे झाला या बाबी असणार आहेत.

झुबीन गर्ग १९ सप्टेंबर रोजी सेंट जॉन्स बेटाजवळ पाण्यात बेशुद्ध अवस्थेत आढळला होता आणि त्याला ताबडतोब सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याला मृत घोषित करण्यात आले होते. रुग्णालयाने जारी केलेल्या डेथ सर्टिफिकेटमध्ये मृत्यूचे कारण बुडणे असे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये तो लाईफ जॅकेट घालून समुद्रात उडी मारताना दिसत होताय पण नंतर जॅकेट काढून पुन्हा पाण्यात उतरत होता. पोलिसांनी असे व्हिडिओ आणि फोटो शेअर करू नयेत असा इशाराही दिला आहे.

झुबिन गर्ग भारत-सिंगापूर राजनैतिक संबंधांच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आणि भारत-आसियान पर्यटन वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिंगापूरमध्ये होता. त्याच्या अकाली मृत्यूनंतर, १९ ते २१ सप्टेंबर रोजी होणारा ईशान्य भारत महोत्सव रद्द करण्यात आला. दरम्यान, भारतात आसाम पोलिसांनी झुबिनचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंत यांना दिल्ली येथून अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली सदोष हत्या, गुन्हेगारी कट रचणे आणि निष्काळजीपणाने मृत्यू घडवून आणल्याबद्दल आरोप ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, झुबिन गर्गचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांनी १८ सप्टेंबर रोजी झुबिनच्या मृत्यूच्या आदल्या रात्री पार्टीला उपस्थित असलेल्या एसआयटीला सांगितले. या पार्टीत सिद्धार्थ, झुबीनचा सहकारी शेखर गोस्वामी, त्याचे नातेवाईक संदीपन गर्ग आणि सिंगापूर आसाम असोसिएशनचे अनेक सदस्य होते. या आसामी सांस्कृतिक आयकॉनच्या अकाली मृत्यूमागील सत्य पूर्णपणे उघड करण्यासाठी भारत आणि सिंगापूर दोन्ही ठिकाणी तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande