रत्नागिरी : सम्राज्ञी शेलार रंगवणार ‘स्वराभिषेक’ची दिवाळी पहाट मैफल
रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) | स्वराभिषेक संस्था आणि जयेश मंगल पार्कतर्फे येत्या मंगळवारी (दि. २१ ऑक्टोबर) दिवाळी पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ''स्वराभिषेक''चे शिष्य शास्त्रीय आणि सुगम गायन सादर करणार असून, गोव्यातील प्रसिद्ध
सम्राज्ञी शेलार


रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) | स्वराभिषेक संस्था आणि जयेश मंगल पार्कतर्फे येत्या मंगळवारी (दि. २१ ऑक्टोबर) दिवाळी पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 'स्वराभिषेक'चे शिष्य शास्त्रीय आणि सुगम गायन सादर करणार असून, गोव्यातील प्रसिद्ध गायिका सम्राज्ञी आईर-शेलार यांच्या गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

थिबा पॅलेस रोडवरील जयेश मंगल पार्क येथे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता ही मैफल सुरू होईल. 'स्वराभिषेक'च्या विनया परब यांच्या संगीत संयोजनाखाली त्यांचा शिष्यवर्ग शास्त्रीय, भावगीत, अभंग, भक्तिगीते, नाट्यगीते आणि चित्रपटगीते सादर करणार आहे.

त्यांच्यासमवेत मैफल रंगवणार असलेल्या सम्राज्ञी शेलार यांचे संगीताचे प्रारंभिक शिक्षण शास्त्रीय गायिका डॉ. शिल्पा डुबळे-परब यांच्याकडे झाले असून, पं. सुधाकर करंदीकर, डॉ. हनुमंत बुरली, डॉ. शशांक मक्तेदार, पं. कमलाकर नाईक, राया कोरगावकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. सूरश्री केसरबाई केरकर संगीत संमेलन, मोगूबाई कुर्डीकर संगीत संमेलन, पं. जितेंद्र अभिषेकी संगीत संमेलन अशा अनेक नामवंत कार्यक्रमांमध्ये त्यांनी गायन सादर केले आहे. त्यांना आकाशवाणी बी श्रेणी प्राप्त असून, गोवा सरकारचा युवा सृजन पुरस्कार मिळाला आहे. सध्या त्या गोवा कला अकादमीत संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

या मैफलीला संवादिनीसाथ महेश दामले, कीबोर्डची साथ मंगेश मोरे, तबलासाथ केदार लिंगायत, पखवाजवाज मंगेश चव्हाण, बासरीसाथ मंदार जोशी आणि तालवाद्याची साथ अद्वैत मोरे करणार आहेत. मधुरा लाकडे, दीप्ती आगाशे आणि मनाली नाईक या निवेदन करणार आहेत. तसेच ध्वनिसंयोजन एस. कुमार साउंड सर्व्हिसचे उदयराज सावंत यांचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande