पुण्यात मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १९ मोबाइलसह दुचाकी जप्त
पुणे, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा बंडगार्डन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघा सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १९ मोबाईल आणि एक दुचाकी असा तीन लाख २३ हजार रुपयांचा म
पुण्यात मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १९ मोबाइलसह दुचाकी जप्त


पुणे, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा बंडगार्डन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघा सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १९ मोबाईल आणि एक दुचाकी असा तीन लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने शहरातील विविध भागांत आठ गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.सोहेल बादशहा खान (२०), आयान झाकिर शाह (२१) आणि फरहान वसीम शेख (२०, तिघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी आरोपींची आहेत. ही टोळी पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवानी चौकात दुचाकीवरून प्रवाशांकडील मोबाईल हिसकावून पसार झाली होती. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिस हवालदार प्रदीप शितोळे, सारस साळवी आणि प्रकाश आव्हाड यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यानंतर तपास पथकाने कोंढवा परिसरातून तिघांना अटक केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande