लातूर - विविध रस्ते आणि नाली बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
लातूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.) रेणापूर येथील विविध विकास कामासाठी गेल्या आठवड्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. दिपावलीच्या निमित्ताने भाजपाचे नेते आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापुर शहरातील विविध सिमेंट रस्ते आणि नाली बा
लातूर - विविध रस्ते आणि नाली बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर


लातूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)

रेणापूर येथील विविध विकास कामासाठी गेल्या आठवड्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. दिपावलीच्या निमित्ताने भाजपाचे नेते आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापुर शहरातील विविध सिमेंट रस्ते आणि नाली बांधकामासाठी आणखी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने भाजपाचे रमेशआप्पा आमदार ! कामगिरी दमदार !! अशीच भावना रेणापूरच्या नागरिकांतून व्यक्त होत आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात रेणापूर नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्यापासून राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला मंजूर निधीतून रेणापूर येथे नवीन पाणीपुरवठा योजना, श्री रेणुका देवी मंदिर भक्तनिवास, अशोक सम्राट बौद्ध विहार, मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना, बालाजी मंदिर परिसरात भव्य सभागृह, रेणा नदीवर घाट विकसित करणे, श्री रेणुका देवी मंदिर परिसर विकासीत करणे, अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर, रेड्डी समाज भवन, हनुमान मंदिर सभागृह, अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, पथदिवे, अंगणवाडी बांधकाम यासह विविध विकास कामे होत आहेत. यातील काही कामे झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत इतर उर्वरित कामाला येत्या काही दिवसात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

गेल्या १४ ऑक्टोबर रोजी रेणापूर येथे ३ कोटी रुपये खर्चाचे इंनडोअर क्रीडा संकुलन, वाचनालय विकसित करण्यासाठी १ कोटी आणि बालाजी मंदिर येथील सभागृहाच्या उर्वरित बांधकामासाठी १ कोटी रुपये असे एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. रेणापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाल्याने सर्वांगीण विकासाला गती मिळाली.

रेणापूर शहरातील अंतर्गत रस्ते आणि नाली बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे भाजपाचे नेते आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या नियोजन विभागाने नागरी सेवा व सुविधा करिता सहाय्यक अनुदान योजनेतून २० ऑक्टोबर २५ रोजीच्या शासन निर्णय पत्रकांन्वये तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूरी झाला आहे. त्यात प्रभाग ११ मध्ये ६० लक्ष, प्रभाग १६ मध्ये १ कोटी ५० लक्ष, प्रभाग १२ मध्ये ७० लक्ष, प्रभाग १ मध्ये २० लक्ष, प्रभाग १३ मध्ये ४० लक्ष, प्रभाग १४ मध्ये ३० लक्ष, प्रभाग १० मध्ये ५० लक्ष, प्रभाग २ मध्ये ५० लक्ष, आणि प्रभाग १५ मध्ये ३० लक्ष असे एकूण पाच कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

रेणापूर शहराच्या विकास कामासाठी गेल्या आठवड्यात पाच आणि आणखी पाच असे एकूण दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपाचे नेते आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांचे भाजपाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande