जालना नगरपालिकेवर भाजपाचाच विजयाचा झेंडा फडकेल - आ. बबनराव लोणीकर
परतूर विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंप; शिवाजीराव जाधव यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश जालना, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। जनतेच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले यापुढे देखील करत
अ


परतूर विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंप; शिवाजीराव जाधव यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश

जालना, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।

जनतेच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले यापुढे देखील करत राहणार असे आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन केले. आपल्या गावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अविरत काम करत आलो आहे, असे प्रतिपादन लोणीकर यांनी केले.

परतूर विधानसभा मतदारसंघात आज मोठा राजकीय भूकंप घडून आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे शेकडो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण केली आहे. या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परतूरमध्ये भाजपला मोठे बळ मिळाले आहे. ज्ञानेश्वर माऊली तनपुरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री शिवाजीराव जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

परतूर येथे दीपावली पाडव्याच्या निमित्ताने आयोजित स्नेह मिलन कार्यक्रम प्रसंगी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीत कार्यरत होतो, मात्र स्थानिक स्तरावर नेतृत्वाचा अभाव, गोंधळलेली दिशा आणि जनतेपासून दुरावलेली भूमिका यामुळे आम्ही नाराज झालो होतो.

दिवाळी स्नेह मिलन ही आमदार बबनराव लोणीकर यांनी मागील 27 वर्षापासून सुरू केलेली परंपरा असून ही परंपरा यापुढे देखील कायम सुरू राहील असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी केले.

पक्षप्रवेश करताना कार्यकर्त्यांनी भाजपचे नेतृत्व, पक्षाची विकासाभिमुख भूमिका आणि पारदर्शक कारभार याबद्दल विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झपाट्याने बदल घडतो आहे. आम्हालाही त्या परिवर्तनाचा भाग व्हायचं आहे, असे नवप्रवेशित कार्यकर्ते शिवाजीराव जाधव व माऊली तनपुरे यांनी सांगितले.

परतूरमध्ये भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आम्हाला मिळतो आहे. आम्ही सर्वांचा सन्मान राखून, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचे काम करत आहोत. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली असून हा केवळ पक्षप्रवेश नाही, ही विरोधकांच्या बद्दल जनतेच्या मनातील नाराजीची झलक आहे, असे प्रतिपादन लोणीकर यांनी केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande