लातूर - वैशाली देशमुख यांनी घेतला गळीत हंगाम पुर्व तयारीचा आढावा
लातूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय आई वैशालीताई देशमुख, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार वैजनाथदादा शिंदे यांच्यासह संचालक मंडळ बैठकीसाठी कारखाना स्थळी गेलो असता तेथे n विलासरा
वैशालीताई देशमुख


लातूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय आई वैशालीताई देशमुख, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार वैजनाथदादा शिंदे यांच्यासह संचालक मंडळ बैठकीसाठी कारखाना स्थळी गेलो असता तेथे n विलासराव देशमुख साहेब यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

संचालक मंडळ बैठकीदरम्यान आगामी कांही दिवसात सुरू होत असलेल्या गळीत हंगाम पूर्वतयारीचा आढावा घेतला.

यावर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरीवर्ग अडचणीत आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेत, त्यांच्या उसाच्या गाळपाचे नियोजन करावे, या नियोजनाप्रमाणे ऊस तोडीचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्यात यावे, अधिकाधिक कार्यक्षमतेने कारखाना चालवून जास्तीत जास्त उसाचे गाळप करावे अशा सूचना याप्रसंगी दिल्या आहेत.

विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या वर्षात नव्याने १५ हार्वेस्टर व ३० इनफिल्डर खरेदी करण्यात आले आहेत त्यांचे पूजनही यावेळी करण्यात आले. शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत व्हावे यासाठी मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांच्या वतीने ऊस तोडणीचेही यांत्रिकीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे, या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या १० हजार मुलांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे याप्रसंगी बोलताना सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande