‘मोंथा’ चक्रीवादळ 28 ऑक्टोबरपर्यंत तीव्र होण्याची शक्यता
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : ‘मोंथा’ चक्रीवादळ आगामी 28 ऑक्टोबरपर्यंत तीव्र वादळामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम या भागांदरम्यान धोका निर्माण होऊ शकतो. भारतीय हवामा
चक्रीवादळ लोगो


नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : ‘मोंथा’ चक्रीवादळ आगामी 28 ऑक्टोबरपर्यंत तीव्र वादळामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम या भागांदरम्यान धोका निर्माण होऊ शकतो.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) सांगितले की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता चक्रीवादळाच्या रूपात विकसित झाले आहे. या वादळामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, सुमारे 15 जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.हवामान विभागानुसार, ‘मोंथा’ हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबरच्या संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात बदलेल आणि मछलीपट्टनम ते कलिंगपट्टनमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून ओलांडेल.

बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात 26 ऑक्टोबर रोजी तयार झालेलं गहिरे दाबाचे क्षेत्र आता चक्रीवादळात परिवर्तित झाले असून, 28 ऑक्टोबरपर्यंत ते अधिक तीव्र स्वरूप धारण करेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.चक्रीवादळ आंध्र प्रदेशमधील काकिनाडा जवळ पोहोचण्याची शक्यता असून ते ओडिशातील मलकानगिरीपासून सुमारे 200 किमी अंतरावर असेल. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 100 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. येणाऱ्या आपत्तीचा परिणाम 15 जिल्ह्यांवर होईल, त्यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.‘मोंथा’ चक्रीवादळामुळे 27 ते 30 ऑक्टोबरदरम्यान आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि तमिळनाडू येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पावसाचा अंदाजानुसार वेळापत्रक :

रायलसीमा, तमिळनाडू, केरळ आणि माहे : 27–28 ऑक्टोबर

तटीय कर्नाटक: 26–28 ऑक्टोबर

तटीय आंध्र प्रदेश आणि यनम: 26–30 ऑक्टोबर

तेलंगणा आणि ओडिशा: 27–30 ऑक्टोबर

छत्तीसगड: 27–30 ऑक्टोबर----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande