आष्टी तालुक्यातील पर्यटन स्थळासाठी 2 कोटी रुपये निधीमंजूर
बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।आष्टी तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी एकूण ०२ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.आष्टी तालुक्यातील विविध स्थळां
आमदार


बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।आष्टी तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी एकूण ०२ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.आष्टी तालुक्यातील विविध स्थळांचा पर्यटन विकास व्हावा या पाठपुराव्याला यश मिळाले असून प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२५-२६ अंतर्गत आष्टी तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी एकूण ०२ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.

या मंजुरीअंतर्गत मौजे मुर्शदपूर येथे माऊली मंदिर परिसराचे सुशोभीकरण, मौजे चिखली येथे लक्ष्मी माता मंदिर परिसराचे सुशोभीकरण, मौजे वाळूज येथे भैरवनाथ मंदिर परिसराचे सुशोभीकरण तसेच मौजे हातोला येथे श्री क्षेत्र राजे धर्माजी गड परिसराचे सुशोभीकरण अशी महत्त्वपूर्ण कामे करण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने या ठिकाणी विकासकामे व सेवा सुविधा निर्माण करणे सोईचे होईल.असे आमदार धस यांनी सांगितले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande