पुणे : अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई
पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार रोखण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत “महाराष्ट्र गौण खनिज (विकास व विनियमन) नियम, २०१३ लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार संबंधित विभागां
पुणे : अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई


पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार रोखण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत “महाराष्ट्र गौण खनिज (विकास व विनियमन) नियम, २०१३ लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार संबंधित विभागांमार्फत समन्वयाने कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी कळविल्यानुसार वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वापर व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम तसेच त्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या कार्यक्षेत्रांमध्ये करण्यात येईल. गुन्ह्यानुसार कारवाईचे स्वरूप पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले आहे. पहिला गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना ३० दिवसांसाठी निलंबित करणे. दुसरा गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना ६० दिवसांसाठी निलंबित करणे,तिसरा गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना कायमस्वरूपी रद्द करणे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून अवैध उत्खनन व वाहतुकीविरुद्ध संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही शिथिलता न दाखवता तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande