डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणी आ. क्षीरसागरांनी घेतली अजित पवारांची भेट
बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेऊन मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन दिले.आपल्या संवेदना जागृत करून या
बीड


बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेऊन मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन दिले.आपल्या संवेदना जागृत करून या प्रकरणी जे दोषी आसतील त्यांच्या विरोधात कठोर शासन होण्यासाठी पवारांना विनंती केली.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात रहिवासी असणाऱ्या डॉ संपदा मुंडे या फलटण ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य अधिकारी या पदावर कर्तव्यावर होत्या.फलटण येथील पोलीस प्रशान व आरोग्य प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. हे अत्यंत दुर्दैवी आहे.अशी त्यांनी सांगितलेशिव - फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रगतशील महाराष्ट्र राज्यामध्ये एक महिला डॉक्टर आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलते या सारखे दुर्दैव नाही असे ते म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande