
बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून मृत्यू पश्चात त्यांना न्याय देण्याची मागणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री . अजितदादा पवार यांच्या कडे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आमदार पंडित यांनी या निवेदनात म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील मौजे कवडगाव ता. वडवणी येथील रहिवाशी असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यू मुळे संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राजकीय पदाधिकाऱ्यांसह पोलिस अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे महिला आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. फलटण येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेचे बीड जिल्ह्यात गंभीर पडसाद उमटले आहेत, अनेक सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून घटनेचा निषेध करत चौकशीची मागणी केली आहे.--------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis