‘गुस्ताख इश्क’मधील नवं गाणं ‘शहर तेरे’ प्रदर्शित
मुंबई, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। बॉलीवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आपला डेब्यू चित्रपट ‘गुस्ताख इश्क’ मधून सिनेविश्वात पदार्पण करत आहेत. या चित्रपटातील तिसरं रोमँटिक गाणं ‘शहर तेरे’ नुकतंच प्रदर्शित झालं असून संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय ठर
‘गुस्ताख इश्क’मधील नवं गाणं ‘शहर तेरे’ प्रदर्शित


मुंबई, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। बॉलीवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आपला डेब्यू चित्रपट ‘गुस्ताख इश्क’ मधून सिनेविश्वात पदार्पण करत आहेत. या चित्रपटातील तिसरं रोमँटिक गाणं ‘शहर तेरे’ नुकतंच प्रदर्शित झालं असून संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

याआधी प्रदर्शित झालेली गाणी ‘उल जलूल इश्क’ आणि ‘आप इस धूप’ प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळवून गेली होती. आता या नव्या ट्रॅकनेही श्रोत्यांच्या भावनांना स्पर्श केला आहे.

‘शहर तेरे’ हे गाणं त्या अधुरी आठवणी आणि विरहाच्या क्षणांचा अनुभव देतं, जेव्हा प्रतीक्षेतील प्रत्येक सेकंद एखाद्या न संपलेल्या प्रेमाची कुजबुज बनतो. थंडीची झुळूक, पाऊस आणि शांततेतील वेदना या सगळ्याचं सुंदर मिश्रण या सुरेल गीतात ऐकायला मिळतं.

चित्रपटातील विजय वर्मा आणि फातिमा सना शेख यांची भावपूर्ण केमिस्ट्री गाण्याला अधिक उंचीवर नेते. तर नसीरुद्दीन शाह आणि शारीब हाशमी यांच्या प्रभावी उपस्थितीमुळे गाण्याची दृश्यात्मकता अधिक प्रभावशाली भासते.

या गाण्यामागे इंडस्ट्रीतील नामांकित कलाकारांचा हात आहे —

संगीत: विशाल भारद्वाज

गायक: जाझिम शर्मा आणि हिमानी कपूर

गीत: गुलजार

गुलजार यांच्या शब्दांची भावनिक खोली आणि विशाल भारद्वाज यांच्या संगीतातील गोडवा या गीताला अमरत्वाची छटा देतात.

‘गुस्ताख इश्क’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विभु पुरी यांनी केले असून, निर्मिती मनीष मल्होत्रा आणि त्यांचा भाऊ दिनेश मल्होत्रा यांनी स्टेज 5 प्रॉडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. ही एक क्लासिक प्रेमकथा आधुनिक अंदाजात सादर होणार असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande