बीड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।अंबाजोगाई शहरातील नागरिकांसाठी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी एका उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष राज किशोर पापा मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
मोफत नोंदणी अभियानाचे आयोजन रफिक गवळी आणि दत्ता सरवदे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात जनसहभाग दिसून आला.
या अभियानात पी.टी.आर. नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड डाटा एन्ट्री, बांधकाम कामगार योजना, रमाई आणि पंतप्रधान आवास घरकुल योजना, तसेच श्रावण बाळ योजना यांसारख्या योजनांची माहिती आणि नोंदणी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. समाजातील सर्व घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा हा एक प्रशंसनीय उपक्रम ठरला. असे मोदी यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis