बीड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणी अभियान दिनांक १ ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे.
या मतदार संघातून मागील तीन टर्म सातत्याने आमदार सतिश चव्हाण या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत.
त्यांच्या उपस्थितीत गेवराई विधानसभा मतदारसंघातील पदवीधर मतदार नोंदणी बाबत गेवराई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आढावा घेतला.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत गेवराई तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे काम या भागातील मतदारांनी केले होते. पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करावेत असे आवाहन यानिमित्ताने केले.
आ. सतिष चव्हाण यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून मतदार नोंदणी बाबतचे आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती दिली. गेवराई विधानसभा मतदारसंघात सर्व पदवीधरांपर्यंत जाऊन सर्वाधिक मतदार नोंदणी करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
बैठकीला जय भवानी, जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis