सौदी अरेबिया बस अपघात : भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल अभिनेता चिरंजीवी यांनी व्यक्त केले दुःख
हैद्राबाद , 17 नोव्हेंबर (हिं.स.)। सौदी अरेबियामध्ये बुधवारी मक्का ते मदीना जात असलेली एक बस डिझेल टँकरला धडकली. धडकेनंतर बसला भीषण आग लागली आणि या अपघातात अनेकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश असल्याचे समजत आहे. य
सौदीअरेबिया बस अपघात : भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल अभिनेता चिरंजीवी यांनी व्यक्त केले दुःख


हैद्राबाद , 17 नोव्हेंबर (हिं.स.)। सौदी अरेबियामध्ये बुधवारी मक्का ते मदीना जात असलेली एक बस डिझेल टँकरला धडकली. धडकेनंतर बसला भीषण आग लागली आणि या अपघातात अनेकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश असल्याचे समजत आहे. या दुःखद घटनेवर दक्षिणेचे लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

माध्यमांशी बोलताना चिरंजीवी म्हणाले, “आमच्या संवेदना पीडितांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. आम्ही प्रार्थना करतो की या अपघातात मृत झालेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो.”

चिरंजीवीची ‘विश्वंभरा’ ही फिल्म पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात चिरंजीवींसोबत अभिनेत्री तृषा कृष्णन दिसणार आहेत, तर आशिका रंगनाथ आणि कुणाल कपूरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande