अजित पवार व सुनील तटकरे यांच्या निर्णयाचे परभणीत स्वागत
परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील आठ जणांना स्टार प्रचारक म्हणून संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे. उ
अजित पवार व सुनील तटकरे यांच्या निर्णयाचे परभणीत स्वागत


परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील आठ जणांना स्टार प्रचारक म्हणून संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आदेशानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी या स्टार प्रचारकांची घोषणा केली.

या निर्णयाचे परभणी येथील लोकश्रेय मित्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी स्वागत केले आहे.

घोषित आठ स्टार प्रचारकांमध्ये ना. हसन मुश्रीफ, आ. सना मलीक, झीशान सिद्दीकी, माजी मंत्री नवाब मलिक, मुस्ताक अंतुले, इद्रिस नाईकवाडी, नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काजी यांचा समावेश आहे.

सलीम इनामदार म्हणाले की, “राज्यात तसेच अनेक शहरांतील नगर परिषद क्षेत्रात मुस्लिम समाजाची लक्षणीय संख्या आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व नगराध्यक्ष मोठ्या प्रमाणात निवडून येतील अशी अपेक्षा आहे.”

राज्यातील मुस्लिम बांधवांनी विकासाच्या दृष्टीकोनातून अजित पवार यांच्या नेतृत्वाला बळ देत पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या निर्णयाचे स्वागत पत्रकार फाईम काजी, माजी नगरसेवक वसीम कबाडी, एयाज अन्सारी, अन्वर अन्सारी, सय्यद मुस्तफा, शेख सत्तार, शेख सुमेर, दानिश इनामदार, कादर इनामदार यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande