राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आल्यास ५ वर्ष निधीची कधीच कमतरता पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री पवार
छत्रपती संभाजीनगर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास पुढील ५ वर्ष निधीची कधीच कमतरता पडू देणार‌ नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज परतुर येथील जाहीर सभेत दिली परतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणू
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास पुढील ५ वर्ष निधीची कधीच कमतरता पडू देणार नाही,


छत्रपती संभाजीनगर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास पुढील ५ वर्ष निधीची कधीच कमतरता पडू देणार‌ नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज परतुर येथील जाहीर सभेत दिली

परतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. शांताबाई बाबुराव हिवाळे तसंच सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते

यानिमित्तानं काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना संबोधित केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,

ह्या निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असताना या काळात परतूरवासीयांची साथ, विश्वास आणि पाठिंबा फार महत्त्वाचा आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शांताबाई हिवाळे या प्रामाणिक, जमिनीवर पाय ठेवून काम करणाऱ्या महिला आहेत. अनुभवी, नवीन, तरुण वर्ग अशा पद्धतीनं सर्वांचं मिश्रण असलेले उमेदवार पक्षाच्या वतीनं जनसेवेखातर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही निवडणूक फक्त निवडणूक नाही; ही परतूरच्या विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी पुढे जाणारा कार्यकर्ता म्हणून मी सर्व महामानवांना आणि परतूरच्या आराध्य दैवत पातेश्वर महादेवाला नमन करतो. परतूरचा विकास फक्त नियोजनबद्ध नसावा, तर तो सर्वसमावेशक असला पाहिजे. सर्व समाज, सर्व घटक, सर्व पिढ्या सोबत घेऊन जाणारा असला पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास पुढील ५ वर्ष निधीची कधीच कमतरता पडू देणार नाही, अशी हमी सभेच्या निमित्तानं दिली. ज्या पद्धतीनं बारामती, पिंपरी–चिंचवडमध्ये विकासकामं झाली आहेत, त्याच पद्धतीनं आता राज्यभर आणि परतूरमध्येही विकास घडवून आणायचा आहे, असं स्पष्ट केलं.

परतूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, सर्व समाजात सलोखा टिकवण्यासाठी सौ. शांताबाई हिवाळे यांच्यासह पक्षाचे सर्व उमेदवार प्रामाणिकपणे काम करतील, यात काही शंका नाही. त्यामुळे मतदारराजानं फक्त घड्याळ चिन्हावर बटण दाबावं, असं आवाहन केलं. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं, असं देखील सूचित केलं

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande