
बीड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
ऊस दरासाठी सोमवार, २४ नोव्हेंबरपासून माजलगावात बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. २४ नोव्हेंबरपासून माजलगाव येथे वसंतराव नाईक चौकात बेमुदत चक्काजाम आंदोलन होणार आहे. ऊसतोड बंद ठेवण्याचे आणि वाहतूक थांबवण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. २३ नोव्हेंबर रोजी गावागावात टायर जाळून आंदोलन केले जाणार आहे.
माजलगाव बाजार समितीत जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांची बैठक झाली. शेतकरी प्रतिनिधींनी सर्व कारखान्यांना भेट देऊन एफआरपीप्रमाणे एकरकमी दर मागितला. मात्र कारखान्यांनी कोणताही स्पष्ट प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती अजित नवले यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis