
बीड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। माजलगाव नगर परिषद अध्यक्ष निवडणुकितून येवले, नितीन नाईकनवरेची माघार घेतली आहे. २६ जागासाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १३ प्रभागातील २६ जागांसाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून नगर अध्यक्ष पदासाठी मनीषाताई नितीन नाईकनवरे सह राधाताई तुकाराम येवले यांनी रातोरात आपला निर्णय बदलला.यामुळे भाजपाच्या डॉ. संध्या मेंडके, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेहरुनबी पटेल, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिफा चाऊस आणिउबाठा शिवसेनेच्या सोनाली पैंजने यांच्यात लढत होणार आहे.
केवळ चारच जण नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत असले तरी खरी लढत भाजपचे डॉ. संध्या ज्ञानेश्वर मेंडके, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या च्या मेहरुनबी खलील आतार पटेल आणि शरद पवार राष्ट्रवादी च्या शिफा बिलाल चाऊस यांच्यात असली तरी शिवसेना उबाठा शिवसेनेच्या सोनाली गोपाळ पैंजने यांना कमी लेखून चालणार नाही.
१३ प्रभागातील २६ नगरसेवक जागांसाठी सर्वच प्रमुख पक्षांचे १४६ जण निवडणूक रिंगणात दिसणार आहेत. शहरात जवळपास निम्मे मतदार हे मुस्लिम आहेत. त्या पाठोपाठ दलित मराठा आहेत आणि नगराध्यक्ष पद महिला ओबीसी आहे त्यामुळे कदाचित निकाल अनपेक्षित येऊ शकतो ! असे जाणकारांचे म्हणणे आहे. होत असलेली निवडणूक ही आ. प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप बाबुराव पोटभरे यांनी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची केली असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नगरपालिका निवडणुकीला अर्ज मागे घेण्याच्या दिवसापासून वेगळे वळण आले आहे. माजी नगराध्यक्ष सहाल चाउस यांच्या कुटुंबातील तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. उमेदवारांमध्ये आता कांटे की टक्कर होणार आहे.
माजलगावात तेरा प्रभागांसाठी २६ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. ४० हजारांवर मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis