
मालेगाव, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
- गेल्या शुक्रवारी (दि. २१) रोजी झालेल्या जनआक्रोश मोर्चातील काही उपद्रवी सुमारे २०० ते २६० अनोळखी इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान केले व सार्वजनिक शांतता धोक्यात आणत, सरकारी कामात अडथळा आणला व दंगा केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी झालेल्या मोर्चानंतर काही अज्ञात जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडून मुख्य प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या होत्या. तसेच न्यायालय परिसर व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुमारे दोन ते तीन तास गोंधळ घातला होता. या प्रकाराची पोलीस यंत्रणेने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार किशोर पद्माकर साळवे यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी अकरा ते तीन या काळात हा प्रकार घडला. जनआक्रोश मोर्चातील काही उपद्रवी अंदाजे २०० से २५० संशयित आरोपींनी अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. गैरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले व सार्वजनिक शांतता धोक्यात आणतील असे कृत्य केले, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपाससहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील हे करीत आहेत. दरम्यान जमावाने न्यायालयात घुसण्याचा केलेला प्रयत्न व तोडफोडीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२४) रोजी दुपारी दोन वाजता वकील संघाची बैठक होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV