जळगावमार्गे नवीन विशेष एक्स्प्रेस सुरु
जळगाव , 3 नोव्हेंबर (हिं.स.) दिवाळीनंतर आता परतीच्या प्रवासाला लागल्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. अशातच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे दोन नवीन गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून या गाड्या जळगाव आणि भ
रेल्वे लोगो


जळगाव , 3 नोव्हेंबर (हिं.स.) दिवाळीनंतर आता परतीच्या प्रवासाला लागल्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. अशातच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे दोन नवीन गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून या गाड्या जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणार असल्यानं जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.गाडी ०९५२० ओखा-मदुराई ही ३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी ओखा येथून सुटेल. मंगळवारी सायं. ६.३५ वाजता जळगावात थांबा घेईल, रेल्वे क्रमांक ०९५१९ मदुराई-ओखा रेल्वे ७ ते २८ नोव्हेंब दरम्यान दर शुक्रवारी पहाटे १.१५ वा. मदुराईहून सुटेल. जळगावात थांबा घेईल, त्यानंतर ओखासाठी रवाना होईल. ओखा-मदुराई गाडीला द्वारका, जामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, उधना, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अकोला, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, निजामाबाद, काचेगुडा, महबूबनगर, ढोणे, गूटी, रेनिगुंटा, काटपाडी, वेल्लोर कॅन्टोन्मेंट. तिरुवन्नमलाई, विल्लुपुरम, श्रीरंगम, तिरुच्चिरापल्ली, मानपराई, दिंडीगुल आणि कोडाईक्कनाल रोड स्टेशन दोन्ही दिशांनी. रेल्वे क्रमांक ०९५७५ राजकोट- महेबूबनगर रेल्वे ३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी दुपारी १.४५ वाजता सुटेल. तसेच गाडी क्रमांक ०९५७६ महबूबनगर–राजकोट ही गाडी ४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक मंगळवारी रात्री ११ वाजता सुटेल आणि गुरुवारी सकाळी ५ वाजता राजकोटला पोहोचेल. या गाडीला वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आणंद, वडोदरा, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, वसमत, पुर्णा, हजूर साहिब नांदेड, धर्माबाद, बसर, निजामाबाद, कामरेड्डी, मेडचाळ, काचेगुडा, उमदानगर, शादनगर आणि जडचेां स्टेशन दोन्ही दिशेने.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande