कृषि समृद्धी योजनेत चिया लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अकोला, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात चिया लागवड क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने कृषी समृद्धी योजनेत चिया लागवडीसाठी प्रत्येक तालुक्यातील ५३५ शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात एकूण ३ हजार ७४५ शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आ
कृषि समृद्धी योजनेत चिया लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


अकोला, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात चिया लागवड क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने कृषी समृद्धी योजनेत चिया लागवडीसाठी प्रत्येक तालुक्यातील ५३५ शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात एकूण ३ हजार ७४५ शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

या योजनेत चिया पीक प्रात्याक्षिकासाठी प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान ( `६ हजार रू. प्रतिएकर` ) इतके असेल. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लाभ घेता येईल. सहाय्यक कृषि अधिका-यांमार्फत शेतकऱ्यांनी लागवड केल्याचे प्रमाणपत्र व लागवडीचा जिओ टॅग फोटो अनुदान मिळण्यासाठी बंधनकारक राहील.

लाभासाठी विहित अर्ज केलेला असावा. शेतकरी ओळखपत्र, सातबारा / ८ अ अनिवार्य,तालुका कृषी अधिकारी यांचे पूर्वसंमती पत्र आवश्यक आहे.

चिया पिकाचे क्षेत्र वाढवणे आणि उत्पादन क्षमता सुधारणा करणे, तंत्रज्ञान-संवर्धीत शेती पद्धती वापरून उत्पादनाची गुणवत्ता टिकवणे, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे सामुहिक कार्य व बाजार व्यवस्थेत सुधारणा करणे अशी योजनेची उद्दिष्टे आहेत.

जिल्ह्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चिया लागवडीसाठी १५ डिसेंबरपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande