अकोला जिपमध्ये कमिशनखोरी बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यास काळे फासणार
अकोला, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या काम वाटप मध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी सुरू असून विशिष्ट कंत्राटदार ह्यांचे साठी विशिष्ट यादी तयार करून सुरू असलेली अनागोंदी बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजें
P


अकोला, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या काम वाटप मध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी सुरू असून विशिष्ट कंत्राटदार ह्यांचे साठी विशिष्ट यादी तयार करून सुरू असलेली अनागोंदी बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना आज दिला.

जि प बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या कार्यलयात वंचित बहुजन युवा आघाडीने पत्रकार परिषद घेत केली

जि.प.बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल. ४ नोव्हेंबर ला संविधान भवन येथे कामवाटप समितीची सभा घेण्यात आली. या सभेत २२ कामे ज्यांची किंमत ३३ लाख रु. दाखवुन जवळपास ७ कोटी ७० लाख रुपये ची कामे छुप्या पद्धतिने वाटप करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्याच प्रमाणे अकोट तालुक्यातील रामापुर (धारूळ ), अकोली जहाँ, तेल्हारा तालुक्यातील झरी बाजार, भिली, अडगाव बु. या ग्रामपंचायत मधील विविध विकास कामे करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सहीत प्रस्ताव देउन सुद्धा टेंडर बुक देण्यासाठी आमदाराचे नाव सांगुन कार्य. अभियंता व कर्मचारी टाळाटाळ करत आहेत.

रामापुर (धारूळ) या गावातील दोन प्रस्तावित कामापैकी एक कामाची टेंडर बुक ठेकेदार घेऊन जातो तर त्याच गावातील दुसरे कामासाठी सरपंचला टाळाटाळ केली जात आहे.

या प्रकरणी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा भेट देऊन कामकाजामध्ये सुधारणा झाली नाही तर युवा आघाडी कार्यकारी अभियंता यांना युवा आघाडी काळ फासेल असा इशारा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande