प्रा. वैशाली पाटील यांना महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर 
धुळे , 7 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक अहोपु/२०२३/ प्र.क्र.७६/का -१० मंत्रालय मुंबई दि. ४ नोहेब्बर २०२५ , रोजी - सदाचार, सदविचार, त्याग समर्पण, दूरदर्शी ,धोरणी, मुत्सद्दी अशा सर्वगुणसंपन्न स्त्रियांमध
प्रा. वैशाली पाटील यांना महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर 


धुळे , 7 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक अहोपु/२०२३/ प्र.क्र.७६/का -१० मंत्रालय मुंबई दि. ४ नोहेब्बर २०२५ , रोजी - सदाचार, सदविचार, त्याग समर्पण, दूरदर्शी ,धोरणी, मुत्सद्दी अशा सर्वगुणसंपन्न स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घेतले जाते. त्यांच्यातील या सदगुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्या स्त्रिया या पद्धतीने महिला आणि बालकासाठी कार्य करतात त्या स्त्रियांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्याचे शासनाचे धोरण असते. यासाठी धुळे जिल्ह्यातील २०२१-२२ या वर्षीचा पुरस्कार हा विद्यावर्धिनी महाविद्यालयातील मानसशास्त्र व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक प्रा. वैशाली पाटील यांना देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यांचे बालकल्याण समितीतील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या व अनाथ बालकासाठी त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य , तसेच बाल स्नेही समाजाच्या उद्देशाने महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र व पोलीस अधिक्षक कार्यालय धुळे येथे ,जिल्ह्यासह ३२ राज्यातील पोलिसांना बाल अधिनियम २०१५ व पोक्सो कायदा यावरील सतत दिले जाणारे प्रशिक्षण, बालगृहातील व बालन्याय मंडळातील बालकांना वेळोवेळी केलेले समुपदेशन कार्यशाळा , बालकल्याण समिती सदस्य या भुमिकेतुन कोरोना काळात ४७० पेक्षा जास्त अनाथ बालकांच्या घेतलेला शोध व त्यांना शासन योजना मिळवुन देणे, अनेक बालके व मतिमंद बालके त्यांच्या आई-वडिलांपर्यंत त्यांच्या राज्यात पोहोचवण्याची प्रक्रिया राबवणे, तरुण मुलांसाठी प्रेम, मैत्री आकर्षण यातील भेद ओळखा ; आत्मविश्वासाकडे वाटचाल ; ब्रेकअप नंतर पुढे काय? अशा यशस्वी मानसशास्त्रीय कार्यशाळा राबवणे, महिला व जेष्ठ नागरिका साठी आयुष्याची गोष्ट, दिल तो बच्चा है जी अशा विविध मानसशास्त्रीय कार्यशाळा घेणे, अनेक शेतकरी आत्महत्या रोखणे , विवाहपूर्व कौन्सलिंग व विवाह नंतर कौन्संंली या उपक्रमातून अनेक घटस्फोट रोखणे, अनेक तरुणांचे आयुष्याला योग्य वळण देणे, व राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यावर शिव व्याख्याने देणे इ. करत असलेल्या दहा वर्षांच्या कामाचा अहवाल पाहून त्यांना हा पुरस्कार घोषित केला आहे. म्हणून त्यांचा विद्यावर्धिनी महाविद्यालयात कॉलेजचे प्राचार्य तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील यांनी महाविद्यालयाने व समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा या उद्देशाने त्यांचा महाविद्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. योगेश पाटील, डॉ. राजवीरेंद्रसिंग गावित , प्रा. पंजाबराव व्यास, डॉ. बाजीराव पाटील,डॉ. निलेश रोटे, डॉ. राजीव आर के,डॉ.कैलास बोरसे,डॉ.प्रशांंत लगडे, डॉ.मंगेश पाटील, इ. सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande