जळगाव - जामनेरमधील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
जळगाव, 7 नोव्हेंबर (हिं.स.)आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तीन माजी महापौरांसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. अशात आज जामनेरातील असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महा
जळगाव - जामनेरमधील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश


जळगाव, 7 नोव्हेंबर (हिं.स.)आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तीन माजी महापौरांसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. अशात आज जामनेरातील असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे जामनेर शहरात आणखी भाजपाची टाकत मजबूत झाली आहे. जामनेर शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले प्रदीप गायके, मनोज महाले, जीवन सपकाळ यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मंत्री गिरीश महाजन यांचे निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तीन माजी महापौरांसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. अशात आज जामनेरातील असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे जामनेर शहरात आणखी भाजपाची टाकत मजबूत झाली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जे. के. चव्हाण, जामनेर शहर मंडल अध्यक्ष रविंद्र झाल्टे, जिल्हा सरचिटणीस आतिष झाल्टे, जितेंद्र पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची जामनेर शहरातील संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande